टीम AM : ‘आत्मपॅम्फ्लेट’. मुळात या चित्रपटाचे नावचं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे. परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. सनी देओल यांनीही सोशल मीडियावरून आपला लहानपणीचा फोटो शेअर करत ‘आत्मपॅम्फ्लेट’ ला शुभेच्छा दिल्या आहेत.
गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज् प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या डार्क कॉमेडी चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ चे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज् निर्माते आहेत. सनी देओल यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, ‘बचपन की यादें हमेशा ही मन को लुभाती हैं ! और ऐसी ही यादों से जुडा ‘आत्मपॅम्फ्लेट’ लेकर आ रहा है आशिष, असे म्हणत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.