माहिती अधिकार, खंडणी : अंबाजोगाईत 9 जणावर गुन्हा दाखल

टीम AM : माहिती अधिकार, ॲट्रोसिटी कायद्याची धमकी दाखवत एका दिव्यांग शिक्षकास 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी शहर पोलिसांनी 2 आक्टोबर रोजी रात्री उशिरा एका शिक्षण संस्थेच्या 4 संचालकांसह माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकारासह 9 जणांवर खंडणीसह विविध 11 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामभारती शिक्षण संस्थेचे सचिव सुरेंद्र भिमराव खेडगीकर, सदस्य सुहास व्यंकटराव काटे, तुकाराम नागोराव बनसोडे, नंदकुमार गोपाळराव गोकुळाष्टमी यांच्यासह प्रा. सुधीर गणपतराव फुलारी, आनंद यशवंत गोसावी, विलास नागोराव जोगदंड, वसंत दहिवाडे यांच्यासह पत्रकार अब्दुल रहेमान पटेल या 9 जणांवर भादविचे कलम 384, 420, 406, 465, 468, 471, 500, 501, 34 सह अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 कायदा 89, 92 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात फिर्याद सेवानिवृत्त दिव्यांग शिक्षक संभाजी तुकाराम लांडे यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.