मांजरा धरण : पाणीसाठा होतोय कमी, पाणी संकट ओढावणार ?

टीम AM : बीड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील मांजरा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. पाणीसाठा कमी होत असल्याने बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठं पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बीड जिल्ह्यातील धरणे पाण्याअभावी कोरडे पडत आहेत. तर नद्या आजही ओस पडलेल्या आहेत. यामुळे पुढील काही दिवसांत मोठं पाणी संकट बीड जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. मुळात बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे धनेगावच्या मांजरा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचं समोर आलं आहे.

धरणात 1.29 टक्के पाणीसाठा

मांजरा धरणात पाणीसाठा आज घडीला 1.29 टक्क्यांवर आला असून यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत असल्याने बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट ओढवण्याचं चित्र निर्माण झाले आहे.