शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या विविध मागण्यांसाठी गावकऱ्यांचा रास्ता रोको

डिघोळ आंबा येथे झाले आंदोलन

अंबाजोगाई : शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या विविध मागण्यांसाठी डिघोळ आंबा येथे गावकऱ्यांचा वतीने आज दिनांक 09 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात गावकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

या संदर्भात देण्याात आलेल्या निवेदनात म्हणटले आहे की, राज्यात रोज शेतकरी आत्महत्या करीत असून राज्य सरकारकडून व प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह शेतमजूर हतबल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रति हेक्टर 50 हजार रूपायांची मदत शेतकऱ्यांना दयावी. शेतमजुरला शेतात काम नसल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतमजुरला 100 दिवसाचा रोजगार उपलब्ध करून द्यावा. गायरानधारक यांना शासनाचे अनुदान व विमा देण्यात यावा. अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांची सर्व पिके वाया गेली असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

राज्य सरकारने याची दखल घेऊन त्वरीत मदत करावी. यासह आदी मागण्या शेतकऱ्यांच्या वतीने व मजुराच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. रास्ता रोको आंदोलन अक्षय भुंबे, सचिन गुंडरे, ॲड. विकास भुरे, धिमंत राष्ट्रपाल, अशोक पालके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.