टीम AM : अंतरवली सराटे, जिल्हा जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा (बु.) येथे मराठा समाज तसेच समस्त ग्रामस्थांनी गावात निषेध मोर्चा काढून आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी एकदिवसीय उपोषण केले.
मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवेली सराटा येथे मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. एक तर मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल अन्यथा माझी प्रेतयात्रा निघेल, अशी भूमिका घेतल्यानंतर शांततेत चाललेले आंदोलन दडपण्यासाठी मराठा आंदोलकावर अमानुष लाठीचार्ज केला. याचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटत असून मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मराठा समाज आक्रमक भूमिका घेताना दिसतोय.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच सदरिल लाठीचार्जच्या निषेधार्थ अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा येथील मराठा समाज तसेच सर्व समाजातील ग्रामस्थांनी गावात निषेध मोर्चा काढून एकदिवसीय उपोषण केले. या उपोषणात सरपंच आबासाहेब पांडे, मेघराज सोमवंशी, शिवराज सोमवंशी, आनंद पांडे रमेश सोमवंशी, पप्पू आदनाक, मदन पाटील, श्रीकृष्ण सोमवंशी, श्रीकांत खोदाणे, अमोल पांडे, गणेश पांडे, श्रीनिवास सोमवंशी, चेतन सोमवंशी, रणजीत आदनाक, अमोल सोमवंशी यांच्यासह धानोरा (बु.) गावातील ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.
उपोषणास्थळी मराठा क्रांती मोर्चा, अंबाजोगाईचे ॲड. माधव जाधव, राजेसाहेब देशमुख, प्रशांत आदनाक, प्रशांत जगताप, राणा चव्हाण, धर्मराज सोळंके, अभिजीत लोमटे, सुधाकर देशमुख, विजयकुमार गंगणे, गणेश गंगणे यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला.