टीम AM : एकीकडे बॉक्स ऑफिसवर सनी देओलचा ‘गदर 2’ चांगली कमाई करत आहे, तर दुसरीकडे रजनीकांत यांच्या ‘जेलर’ सिनेमालाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. रजनीकांत आणि त्यांची संपूर्ण टीम सिनेमाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. याचदरम्यान ‘जेलर’ सिनेमाच्या निर्मात्यांनी रजनीकांत यांना ब्रँड न्यू कार गिफ्ट केली आहे.
22 दिवसात कोट्यवधींच बॉक्स ऑफिस कलेक्शन
नुकताच रजनीकांत यांनी ‘जेलर’ सिनेमाच्या संपूर्ण टीमसोबत केक कापून आनंद साजरा केला. हा सिनेमा 10 ऑगस्ट रोजी 10 भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. ‘जेलर’ सिनेमाने देशभरात 22 दिवसांत 328.20 कोटींची कमाई केली. तर वर्ल्डवाइड सिनेमाने 21 दिवसांत 572.80 कोटींचा गल्ला जमवला.