टीम AM : सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मनोरंजनासाठी तयार केले जातात. तर, काही व्हिडिओ पाहून अनेकांना धडकी भरते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला चक्क विषारी किंग कोब्राचे चुंबन घेत आहे. या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. काही जणांनी या महिलेला धाडसी म्हटले आहे. तर काही जणांनी तिला अशाप्रकारचे जीवघेणे कृत्य न करण्याचा सल्ला दिला आहे.
या व्हिडीओमध्ये एक महिला स्टेजवर भल्या मोठ्या किंग कोब्राचे चुंबन घेताना दिसत आहे. तिला पाहणाऱ्या शेकडो प्रेक्षकांची त्या ठिकाणी गर्दी वाढली. ही महिला काळ्या कपड्याने किंग कोब्राचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर हळूच कोब्राच्या जवळ जाऊन त्याचे चुंबन घेते.
हा व्हिडिओ @Bellashariman नावाच्या एका इंस्टाग्राम पेजकडून शेअर करण्यात आला. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्ही किती काळ जगू सांगता येत नाही. पण तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचे आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले तर काहींनी तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली. ‘ओह माय गॉड हनी, तू खूप धाडसी आहेस,’ अशी एका यूजरने कमेंट केली आहे. तर, दुसऱ्याने म्हटले आहे की, ‘असा जीवघेणा स्टंट जीवावर बेतू शकतो.