धक्कादायक : बहिण – भावंडांचा डेंग्यूने मृत्यू, अबांसाखर परिसरात आजाराचे थैमान

प्रशासनाचे दुर्लक्ष : परिसरात फवारणी करण्यात यावी – ग्रामस्थांची मागणी

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा, वाघाळवाडी, अबांसाखर परिसरात डेंग्यू आजाराने थैमान घातले असुन पंधरवड्यात सख्या बहिण – भावाचा मृत्यु झाला आहे. डेेंग्यू आजाराचे बरेचशे रूग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेेत. दरम्यान, याकडे मात्र प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, गजाकोष आदर्श सतिश (वय 9) इयत्ता 4 थी याचा 1 ऑगस्ट रोजी तर गजाकोष पूनम सतिश (वय 7) इयत्ता 2 री या दोन्ही बहिण – भावाचा डेंग्यू आजाराने पंधरवड्यात मृत्यू झाला. हे दोघेही वाघाळा परिसरात राहणारे असून दोन्ही विद्यार्थी जोगेश्वरी विद्यालयात शिक्षण घेत होते.

वाघाळा, वाघाळवाडी, अबांसाखर परिसरातील बरेच ग्रामस्थ डेंग्यू आजाराने त्रस्त झालेले आहेत. यातील बहुतांश रूग्ण येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय, बर्दापुर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत अबांसाखर परिसरात फवारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.