टीम AM : कवी, लेखक, गीतकार, निर्माता म्हणून ओळखले जाणारे गुलजार आज त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. गुलजारचे खरे नाव संपूर्ण सिंह कालरा असे आहे. त्यांच्या नावाबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. गुुलजार यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी पंजाबच्या झेलम येथे झाला. जे आता पाकिस्तानात आहे. फाळणीनंतर गुलजार अमृतसरला आले होते. गुलजार हे अमृतसरला फार रमले नाही आणि ते मुंबईत आले. त्यांना सुरुवातीपासूनच शायरी, कविता आवडत होती. वेळ मिळाल्यावर ते कविता कागदावर उतरवायचे.
मुंबईत आल्यानंतर गुलजार यांनी रोजीरोटीसाठी गॅरेजमध्ये काम करण्यास सुरवात केली. गॅरेजमध्ये वेळ मिळाल्यावर ते कविता लिहायचे आणि त्यांचा छंद जोपासायचे. 1961 मध्ये विमल रायच्या सहाय्यक म्हणून गुलजार यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यांनी हृषिकेश मुखर्जी आणि हेमंत कुमार यांच्यासोबतही काम केले. यावेळी त्यांना ‘बंदिनी’ चित्रपटात गीत लिहिण्याची संधी मिळाली. ‘बंदिनी’ चित्रपटात त्यांनी ‘मोरा गोरा अंग लेई ले’ लिहिले. हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले होते. गुलजार यांचे पहिले गाणे सुपरहिट होते. सर्वांना हे गाणे खूप आवडले. इथूनच गुलजार यांनी जे लिहिले ते सर्वांच्या मनात घर करून गेले.
गुलजार ने ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं में’, ‘आपकी आंखों में कुछ महके हुए से राज’ पासून अनेक गाणे लिहिले आहेत. गुलजार यांनी ‘कोशिश’, ‘परिचय’, ‘आंधी’, ‘मौसम’, ‘मीरा’, ‘किताब’, ‘माचिस’ असे अनेक उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.
गुलजार यांनी त्यांच्या नावावर अनेक पुरस्कार जिंकले आहेत. गुलजार यांना पद्मभूषण, दादासाहेब फाळके, राष्ट्रीय पुरस्कार यासह 21 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
दोघांच्या नात्यात काहीच आलबेल नव्हतं
गुलजार आणि राखी यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. राखी यांचं आधी अजय बिस्वास यांच्याशी लग्न झालं होतं, पण दोनच वर्षात त्यांनी घटस्फोट घेतला.
घटस्फोटानंतर राखी फिल्मी करिअरमध्ये रमल्या. अनेक हिट सिनेमे दिले. या दरम्यान त्यांची ओळख गुलजार यांच्याशी झाली. नंतर ते प्रेमात पडले. 15 मे 1973 रोजी गुलजार आणि राखी यांनी लग्न केलं होतं. डिसेंबर 1973 मध्ये त्यांना एक मुलगी झाली ती म्हणजे मेघना गुलजार. लग्नाच्या एकाच वर्षात राखी आणि गुलजार यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
लेकीच्या जन्मानंतर राखी आणि गुलजार यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला होता. लेकीच्या जन्मानंतर राखी यांना सिनेसृष्टीत कमबॅक करायचं होतं. पण मुलीची काळजी घेण्यासाठी कोणी नसल्यानं गुलजार यांनी राखी यांना काम करण्यास परवानगी दिली नाही. दोघांच्या नात्यात काहीच आलबेल नव्हतं. याच दरम्यान, गुलजार ‘ऑंधी’ या सिनेमाच्या एका कामानिमित्त काश्मीरला गेले होते, तेव्हा ते राखी यांनाही सोबत घेऊन गेले होते. पण राखी आणि गुलजार यांचा संसार काश्मीरच्या हवेत बहरण्याऐवजी कायमचाच मोडला.
काय घडलं होतं नेमकं ?
काश्मीरमध्ये ‘ऑंधी’ ची संपूर्ण टीम आली होती. टीमसाठी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत अभिनेते संजीव कुमार यांनी असं काही केलं की, गुलजार प्रचंड संतापले होते. संजीव कुमार हे दारुच्या नशेत होते. त्यांनी अभिनेत्री सुचित्रा सेनचा हात पकडला. दारुच्या नशेत संजीव कुमार यांचं वर्तन गुलजार यांना खटकलं. गुलजार यांनी सुचित्रा यांना त्यांच्या खोलीत सोडलं. हे सर्व राखी यांनी पाहिलं. यावर राखी यांनी गुलजार यांना आपल्या आवडत्या अभिनेत्रीला खोलीत सोडताना कसं वाटलं ? असं विचारलं. राखी यांचं असं बोलणं ऐकल्यानंतर गुलजार पुन्हा संतावले. त्यांनी राखी यांच्यारवर हात उगारला. या प्रसंगानंतर त्यांच्या नात्यातला दुरावा वाढतच गेला.