रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने गरजूंना फराळाचे वाटप
अंबाजोगाई : फटाक्यांवर होणारा खर्च म्हणजे वाढते प्रदूषण. हा फटाक्यांचा खर्च टाळून त्या पैशातून उपेक्षितांची दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने रविवारी सकाळी राबविण्यात आला. शहरातील उपेक्षितांना ठिकठिकाणी भेटी देऊन फराळाचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून फटाकेमुक्त दिवाळी हे अभियान राबवून फटाक्यांवर होणारा खर्च गोरगरीबांची व उपेक्षितांची दिवाळी साजरी करण्यासाठी केला जातो. याही वर्षी शहरातील यशवंतराव चव्हाण चौक, दूध डेअरी परिसर, बांधकाम विभागाच्या बाजूची झोपडपट्टी, शहरातील विविध झोपडपट्ट्या, वृद्धाश्रम, भक्तीप्रेम वृद्धाश्रम व स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईकांना, वसतिगृहातील मुलांना फराळाचे वाटप करण्यात आले. जवळपास ४०० कुटुंबांपर्यंत हा फराळ पोहचविण्यात आला.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन कराड, सचिव स्वप्निल परदेशी, प्रकल्प प्रमुख अविनाश मुडेगांवकर, डॉ. डी. एच. थोरात, डॉ. सुरेश आरसुडे, प्रताप पवार, भागवत कांबळे, बाबुराव बाभुळगावकर, जगदीश जाजू, अनंत लोमटे, विश्वनाथ लहाने, संतोष मोहिते, धनराज सोळंके, प्रा. रमेश सोनवळकर, विवेक गंगणे, डॉ. निशिकांत पाचेगांवकर, कल्याण काळे, आनंद कर्नावट, प्रदीप झरकर, गोरख मुंडे, डॉ. अनिल केंद्रे, प्रविण चोकडा, पुरुषोत्तम रांदड, गोपाळ पारीख, आनंद टाकळकर, भीमाशंकर शिंदे यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.