सारा अली खानचा वाढदिवस : ‘या’ अभिनेत्यांसोबत जोडलं होतं नाव, कोट्यवधींची आहे मालकीण

टीम AM : बॉलिवूडमध्ये काम करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. स्टार किड्ससाठी हा मार्ग तुलनेनं सोपा असतो. हिंदी सिनेसृष्टीत अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध करणं हे खूप आव्हानात्मक असतं. पण बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध केलं आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सर्वांना वेड लावलं आहे. आज साराचा वाढदिवस आहे. 

सारा अली खानने ‘केदारनाथ’ (Kedarnath) या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतसोबत झळकली होती. पहिलाच सिनेमा यशस्वी ठरल्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘केदारनाथ’ नंतर रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ या सिनेमात ती झळकली. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला. 

सारा व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत साराचं नाव जोडलं गेलं आहे. कार्तिक आर्यनसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. सारा शुभमन गिलला डेट करत असल्याची चर्चाही रंगली होती. वीर पहाडिया, हर्षवर्धन कपूर आणि ईशान खट्टरसोबतही तिचे नाव जोडले गेले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सारा अली खान एका सिनेमासाठी पाच ते सात कोटी रुपयांचं मानधन घेते. सारा अली खानला बांगड्या घालायला खूप आवडतात. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सारा खूपच जाड लठ्ठ होती. पण नियमित व्यायाम आणि सकस आहार करत तिने आपलं वजन नियंत्रणात आणलं.

सारा अली खान आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. सारा सिनेमांसह जाहिरातींच्या माध्यमातून चांगलेच पैसे कमावते. ती दरमहा सुमारे 50 लाख रुपये कमावते. पाच वर्षांच्या तिच्या कारकिर्दीत तिने 50 कोटींची कमाई केली आहे. सारा अली खानकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. अभिनेत्रीकडे 1.62 कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ जी क्लास जी 350, 28 लाख रुपयांची होंडा सीआरव्ही आणि 28 लाख रुपयांची जीप कंपास सारख्या आलिशान गाड्या आहेत. तसेच मुंबईत तिचं आलिशान घरही आहे.