प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

टीम AM : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेला निकाल कायम ठेवत, सर्वोच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

पुत्रप्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठानं कायम ठेवला होता. त्यामुळे खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदुरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मात्र, सर्वोच्च न्यायालयानं खंडपीठाचा निर्णय कायम ठेवल्यामुळे इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.