टीम AM : औरंगाबाद जिल्हा परिषदेत विविध विभागांत गट – क मधल्या, वाहनचालक पद वगळून इतर सगळ्या संवर्गातल्या सरळसेवेनं भरण्याच्या रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.
यासाठीच्या अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.aurangabadzp.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि अर्ज bpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावर येत्या 25 ऑगस्टपूर्वी दाखल करावेत.
या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनं केलेले अर्जच स्वीकारण्यात येणार आहेत. येत्या पाच तारखेपासून ही ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू झाली आहे.
उमेदवारांना अर्ज करताना काही अडचण आल्यास www.cgrs.ibps.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा 800222366 अथवा 1800 103 4566 या हेल्पलाईन क्रमांकावर दूरध्वनी करावा, असं औरंगाबाद जिल्हा परिषदेनं कळवलं आहे.