टीम AM : सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपणाला हसायला लावतात, तर काही थक्क करणारे असतात, जे पाहिल्यानंतर आपल्याला डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सध्या असाच गाय आणि किंग कोब्राचा एक धक्कादायक आणि तितकाच मनमोहक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये एक गाय बिनधास्तपणे सापाला चाटताना दिसत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ एका IFS अधिकाऱ्याने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘स्पष्ट करणे कठीण आहे. निखळ प्रेमातून मिळालेला विश्वास’
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये गाय चक्क एका सापाला चाटत असल्याचं दिसत आहे. हे दुर्मिळ दृश्य पाहून अनेकजण हे अविश्वसनीय असल्याचं म्हणत आहेत. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुशांत नंदा यांनी गुरुवारी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाख 36 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 4 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.
17 सेकंदाच्या या व्हिडीमध्ये आपण पाहू शकतो की, एक कोब्रा जातीचा साप एका गायीसमोर फणा काढून उभा असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये, दोघेही एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत. यावेळी गाय अचानक जिभेने सापाला चाटायला सुरुवात करते. हे दुर्मिळ दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.