प्रचारसभेला मोठ्या संख्येने सहभागी व्हा – राजकिशोर मोदी, बजरंगबप्पा सोनवणे
अंबाजोगाई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व माजी आ. पृथ्वीराज साठे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांची शुक्रवार,दि.18 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता शंकर महाराज वंजारी वसतीगृह मैदान अंबाजोगाई येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला पुरोगामी आघाडीतील प्रमुख नेते मंडळींची उपस्थिती राहणार आहे. परळी व केज विधानसभा विकासासाठी, प्रगतीसाठी, मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व माजी आ.पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांच्यासह आदींनी केले आहे.
जनसामान्यांमध्ये शरद पवार यांच्या विषयी प्रचंड आदर आहे. शरद पवार यांच्या सभेला राज्यभरात प्रचंड गर्दी होत असून अंबाजोगाई येथे धनंजय मुंडे व पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेली ही सभा ऐतिहासिक आणि विजयाची ठरणार आहे. परळी व केज विधानसभा मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि ग्रामिण भागातील आणि शहरी भागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.