टीम AM : गेल्या आठवड्यात काहीसा शांत झालेला पाऊस आता पुन्हा एकदा मुसळधार बरसू लागलाय. कालपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. तसेच पुढील 5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
मुसळधार पावसामुळे राज्यात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी नद्या – नाले ओसंडून वाहत असून पुरस्थिती निर्माण झालीये. रस्त्यावर सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय.
राज्यातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ज्या ठिकाणी रेड अलर्ट आहे तेथे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यासह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात वाढ झालीये.