करिअर ‘फ्लॉप’, पण जगतो अलिशान आयुष्य, ‘मोहब्बतें’ चा हिरो जुगल हंसराजचा जाणून घ्या जीवनप्रवास

टीम AM : ‘पापा कहते हैै’ आणि ‘मोहब्बतेंं’ सारख्या चित्रपटात दिसलेला अभिनेता जुगल हंसराज याचा आज (26 जुलै) वाढदिवस. जुगल अचानक मोठ्या पडद्यावर दिसेनासा झाला. अर्थात बॉलिवूडशी असलेले त्याचे नाते आजही कायम आहे. 1983 मध्ये ‘मासूम’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून फिल्मी करिअर सुरु करणारा जुगल सध्या काय करतोय, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आ गले लग जा’ या चित्रपटातून जुगलने हिरो म्हणून डेब्यू केला. चॉकलेटी बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगलचा हा पहिला सिनेमा होता. पण हा चित्रपट सुपरडुपर फ्लॉप झाला.

1996 मध्ये ‘पापा कहते है’ मध्ये तो झळकला. या चित्रपटातील ‘घर से निकलते ही…’, हे गाणं तुफान हिट झालं आणि जुगल सगळ्यांच्या डोळ्यात भरला. पण जुगलला खरी ओळख दिली ती ‘मोहब्बतें’ या चित्रपटाने. या चित्रपटाने तो एका रात्रीत स्टार बनला. पण हे स्टारडम फारकाळ टिकले नाही. यानंतरचा एकही चित्रपट हिट ठरला नाही. त्यामुळेच त्याचे करिअर जवळपास संपुष्टात आले. 2010 मध्ये ‘प्यार इम्पॉसिबल’ हा जुगलचा अखेरचा चित्रपट होता.

हिरो म्हणून अपयशी ठरल्यावर करण जोहरने जुगलला मदतीचा हात दिला. फार कमी लोकांना ठाऊक असेल की, शाहरूख व काजोलच्या ‘कुछ कुछ होता है’ या सुपरडुपर हिट सिनेमाच्या टायटल सॉन्गच्या पहिल्या 8 ओळी जुगलने लिहिल्या होत्या. करण आणि जुगल एकदा नाईट आऊटला सोबत गेले होते, त्यावेळी त्यांनी हे गाणं लिहिले होते. नंतर या गाण्यावर काम झाले आणि ते चित्रपटाचे टायटल ट्रॅक बनले.

2014 मध्ये जुगलने त्याची एनआरआय गर्लफ्रेंड जास्मिनसोबत लग्न केले. जुगल आणि जास्मिनचे लग्न ऑकलँडमध्ये झाले आहे. लग्नाचा हा सोहळा अत्यंत खासगी होता. जुगलच्या एका मित्राने ट्विटरवर माहिती शेअर केली, तेव्हा कुठे या लग्नाबद्दल सर्वांना समजले होते. जुगलची स्वत:ची काही रेस्तराँत देखील आहेत. यामधून मिळणाऱ्या पैशांच्या जोरावर तो आलिशान आयुष्य जगतो. 23 वर्षांनंतर जुगल खूप बदलला आहे. त्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे. त्याचे लेटेस्ट फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.