मणिपूर हिंसाचार प्रकरणी वंचित बहुजन महिला आघाडीचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

टीम AM : वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने मणिपूर हिंसाचार प्रकरणी आज दिनांक 26 जुलै रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. 

या निवेदनात मणिपूर हिंसाचार घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा घेण्यात यावा, पिडीत कुटुंबातील वारसांचे पुनर्वसन करण्यात यावे, पिडीत कुटुंबातील वारसांना संरक्षण देण्यात यावे, मणिपूर हिंसाचार घटनेतील दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर सेवेतून बडतर्फीची कार्यवाही करण्यात यावी, असे म्हणटले आहे. 

या निवेदनावर छाया हिरवे, पुष्पा बगाडे, भावना कांबळे, सुधाताई जोगदंड, सुषमा वाघमारे, सुनंदा शिंदे, संध्या शिंदे, स्वाती ठोके, रत्नमाला तरकसे, नंदाताई वारकरी, संगिता कांबळे, जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, गोविंद मस्के आदींच्या सह्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा बसस्थानक मार्गी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. दरम्यान महिलांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.