केज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पृथ्वीराज साठेंना विजयी करा – नगराध्यक्ष आदित्य पाटील

केज : केज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पृथ्वीराज साठे यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी केले. राष्ट्रावादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ केज येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी नगराध्यक्ष आदित्य पाटील बोलत होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष आदित्य पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत भाजप – शिवसेना महाआघाडीची सत्ता असूनही शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने केवळ गोर-गरीबांची दिशाभुल करण्याचे काम केले आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघातील मतदाराने राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.

या प्रसंगी उमेदवार पृथ्वीराज साठे म्हणाले की, माजी खासदार रजनीताई पाटील व माजी मंत्री अशोकदादा पाटील यांनी मागील पोटनिवडणुकीमध्ये सहकार्य केल्यामुळे मी विजयी झालो होतो. मी आमदार झाल्यानंतर जनतेची प्रमाणिकपणे सेवा केली आहे. गोर गरींबाचे प्रश्न सोडवू शकलो. माझ्या हाताने जे ग्रामीण भागात कामे झाले, त्याच जोरावर आज मला पक्षाने तिकीट दिले आहे. रजनीताई व अशोकदादांचे आशीर्वाद व सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाने मी ही लढाई नक्की्च जिंकले असा विश्वा्स मला आहे. केज मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यातचे काम, महिला बचत गट सक्षमीकरण करणे, सर्वांना रेशनकार्ड व धान्य मिळण्या्साठी मी सदैव प्रयत्नशील राहीन, आपली सेवा करेल असेही साठे यांनी नमुद केले.

जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे म्हणाले की, पृथ्वीराज साठे सर्वसामान्य कुटूंबातील व्‍‍‍यक्‍‍‍‍ती असुन त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. माजी आमदार साठे यांना मतदार संघाची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन बजरंग सोनवणे यांनी केले. या बैठकीस अंबा सहकारी साखर कारखान्यानचे व्हा.चेअरमन हनुमंतकाका मोरे, युवा नेते राहुलभैय्या सोनवणे, जेष्ठ नेते विलास सोनवणे, माजी नगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, उपनगराध्यक्ष दलीलभाई इनामदार, जेष्ठ काँग्रेस नेते प्रविणकुमार शेप, शेकापचे जेष्ठ नेते भाई मोहन गुंड, माजी नगराध्यक्ष कबीरभाई इनामदार, नगरसेवक महादेव लांडगे, लक्ष्मणराव डोईफोडे सर यांच्यासह केज तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.