वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वैभव स्वामी यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबाजोगाई : वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव स्वामी यांच्या प्रचारार्थ दि. 15 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई शहरातील प्रमुख मार्गावरून भव्यदिव्य निघालेल्या रॅलीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शहरात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आता गॅस सिलेंडरचाच बोलबाला झाला आहे. वंचितचे प्रणेते श्रद्येय प्रकाश आंबेडकर यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा अंबाजोगाईकरांनी निर्धार केला आहे. साहेबाना मुख्यमंत्री करण्यासाठी निस्पृह आणि निष्कलंक सामान्य पण योग्य उमेदवार म्हणून रिस्क न घेता आमदार म्हणून वंचितचे उमेदवार पत्रकार ॲड.वैभव विवेक स्वामी यांना फिक्स निवडून देण्याचा निश्चय केला.

या रॅलीच्या वेळी बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है,येऊन येऊन येणार कोण, वैभव स्वामी शिवाय आहेच कोण, आदींच्या घोषणांनी अंबाजोगाई शहर दणाणून गेले. विशेष बाब म्हणजे शहरासह संपुर्ण सर्कल मधून आंबेडकर प्रेमी आणि वंचित बहुजन समाज या रॅलीत सहभागी झाल्याने या अचानक ठरलेल्या रॅलीला सुद्धा भव्यदिव्य स्वरूप आले होते. ही रॅली विजयाची मुहूर्तमेढ ठरल्याची चर्चा आता केज मतदारसंघात होऊ लागली आहे.