केज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिनांक १७ आक्टोबर गुरुवार रोजी परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदानावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. केज मतदारसंघातील सर्व नागरिकांनी, शेतकरी, कष्करी बांधवानी तसेच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने या सभेसाठी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे युवानेता अक्षय मुंदडा यांनी केले आहे.
या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या विकासाची कार्यसुत्रे व आतापर्यंत आपण सर्वसामान्यांसाठी काय केले, आगामी काळात काय करणार आहोत यावर भाषण देणार आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात सर्वसमावेशक विकास होत आहे. राज्याचा व जिल्हयाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. विकासाचा वेग असाच कायम ठेवण्यासाठी देशाने नरेंद्र मोदींना वाढत्या मताधिक्याने काम करण्याची संधी दिली. तशीच संधी राज्यातील निवडणुकीत जनतेने द्यावी यासाठीच ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अक्षय मुंदडा यांनी केले आहे.