टीम AM : महाराष्ट्रात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबतचा आदेश काढला आहे. यामुळे तंबाखूचे व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन असलेल्या लोकांची आता चांगलीच पंचाईत होणार आहे. सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेत सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. जर कोणी तंबाखूचे सेवन केल्याचे आढळल्यास तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
तंबाखूवर बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एखाद्या व्यक्तीवर सोपवण्यात येणार आहे. अशा व्यक्तीची नेमणूक करण्याचे आदेशही प्रत्येक सरकारी आणि खासगी कंपन्यांतील कार्यालयांना आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. स्वच्छ भारत, स्वस्थ भारत अभियानांतर्गत राज्यात ही मोहिम राबवण्यात येणार आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने काढलेल्या नव्या आदेशानुसार सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या आदेशाचं उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्याला 200 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.