नीतू सिंह यांचा वाढदिवस : वयाच्या 15 व्या वर्षी ‘या’ अभिनेत्यावर जडला होता जीव ! जाणून घ्या रंजक लव्हस्टोरी

टीम AM : 70 च्या दशकात चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री नीतू सिंह यांचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडमध्ये नीतू सिंह आणि ऋषी कपूर यांची लव्हस्टोरी चर्चेत होती. कारणही तसेच होते.

नीतू सिंह या अवघ्या 15 वर्षाच्या असताना त्यांचा जीव ऋषी कपूर यांच्यावर जडला होता. तेव्हा ऋषी कपूर यांचं वय 21 वर्षे होतं. नीतू सिंह आणि तत्कालीन सुपरस्टार ऋषी कपूर यांच्या रंजक लव्हस्टोरी बद्दल जाणून घेऊयात.

ऋषी कपूर आणि नीतू यांच्यात पहिली भेट 1974 मध्ये झाली होती. तेव्हा ‘जहरीला इंसान’ या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. नीतू या अवघ्या 15 वर्षांच्या होत्या. सेटवरच नीतू आणि ऋषी यांची पहिली भेट झाली. दोघांमध्ये मैत्री झाली.

ऋषी कपूर यांची आधीच गर्लफ्रेंड होती. विशेष म्हणजे ऋषी कपूर यांच्या गर्लफ्रेंडसाठी नीतू सिंह या लव्ह लेटर लिहून देत असतं. परंतू असं करता करता ऋषी आणि नीतू यांच्यात कधी प्रेम फुललं, हे दोघांनाही समजलं नाही.

नीतू रिलेशनशिपबाबत गंभीर होत्या. ऋषी कपूर यांच्या घरी देखील त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती होती. या दरम्यान, राज कपूर यांनी देखील स्पष्ट केलं होतं, दोघांचं एकमेकांवर प्रेम असेल तर विवाह करायला काय हरकत आहे.

सन 1979 मध्ये नीतू आणि ऋषी कपूर यांनी लग्न केलं. परंतू सुरुवातीच्या काळात नीतू सिंह यांची आई या विवाहावरून खूप नाराज होत्या. परंतु नंतर सगळं काही सुरळीत झालं.

ऋषी आणि नीतू सिंह यांच्या विवाहात एक मजेदार प्रसंग घडला होता. नीतू सिंह आणि ऋषी कपूर या दोघांची विवाहाच्या दिवशीच शुद्ध हरपली होती. झालं असं की, नीतू या त्यांच्या वजनदार घागरा चोलीमुळे तर ऋषी कपूर यांनी लग्नाला झालेल्या गर्दीमुळे शुद्ध हरपली होती.