टीम AM : भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याबाबत चर्चा झाल्या असल्या तरी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय कधीही घेतला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्य दौऱ्याचा प्रारंभ आज नाशिक दौऱ्यानं केला, त्यावेळी पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
भारतीय जनता पक्ष प्रादेशिक पक्ष कमकुवत करत असल्याची टीका त्यांनी केली. आपल्याच पक्षातल्या आमदार आणि काही नेत्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो. पक्षातले फुटीर आपण ओळखू शकलो नाही. हा आपलाच दोष आहे, असं ते म्हणाले. आपण थकलेलो नाही आणि निवृत्तही झालेलो नाही, असं त्यांनी आवर्जून नमुद केलं.
आपण आपली मुलगी सुप्रिया सुळे यांच्यावर सतत अन्याय केला. प्रफुल्ल पटेल यांना पराभवानंतरही राज्यसभेवर पाठवलं, केंद्रीय मंत्रिपद दिलं, असं पवार या संदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.