टीम AM : राज्य निवडणूक आयोगाने लवकरच निवडणूका लागण्याचे मोठे संकेत दिले आहेत. राज्यात सप्टेंबर – ऑक्टोबरदरम्यान निवडणुका लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आल्याने लवकरच निवडणूकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाचे मोठे संकेत
सप्टेंबर – ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान असा उल्लेख निवडणूक आयोगाच्या राजपत्रात करण्यात आला आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित काढण्यात येत असल्याचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे.