सहाय्यक प्राध्यापकासाठी आता ‘पीएचडी’ ची आवश्यकता नाही

टीम AM : सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठीच्या नियमांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मोठा बदल केला आहे. ‘युजीसी’ ने सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी थेट भरतीसाठी NET/SET/SLET हा किमान निकष असेल, असे म्हटले आहे. याविषयीची माहिती ‘युजीसी’ चे अध्यक्ष ममिदलाल जगदेश कुमार यांनी दिली असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

यापूर्वी सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यासाठी NET/SET/SLET सह पीएच.डी. चा निकष कायम होता. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) नुकत्याच जाहिर केलेल्या बदलानुसार, उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी NET/SET/SLET हा किमान निकष पुरेसा असल्याचे म्हटले आहे.