टीम AM : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. तर जयंत पाटील यांच्याकडून हा दावा फेटाळून लावला आहे.
मागच्या 24 तासांमध्ये काही आमदारांनी उघडपणे भूमिका घेतली आहे, तर काही जण अजूनही तटस्थ किंवा कोणतीही भूमिका घेतली नसल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेमध्ये 53 आमदार आहेत. यातले कोण आमदार कुणाच्या बाजूला आहेत, याची यादी समोर आली आहे.
शरद पवारांसोबतचे आमदार (15)
जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अनिल देशमुख, संदीप क्षीरसागर, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, राजेंद्र शिंगणे, मकरंद जाधव, अतुल बेनके, शशिकांत शिंदे, मानसिंग नाईक, सुमन पाटील, दौलत दरोडा, राजू नवघरे
अजित पवारांसोबतचे आमदार (20)
अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील, बबनदादा शिंदे, यशवंत माने, नितीन पवार, शेखर निकम, निलेश लंके, मनोहर चांद्रिकापुरे, राजू कारेमोरे, नरहरी झिरवळ, सरोज आहिरे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर
इतर आमदार (18)
किरण लहामटे (शपथविधीला उपस्थितीत)
संग्राम जगताप (शपथविधीला उपस्थित)
इंद्रनिल नाईक (शपथविधीला उपस्थित)
सुनिल टिंगरे (शपथविधीला हजर)
राजेश टोपे
संजय शिंदे
आशुतोष काळे (परदेशात)
सुनिल भुसारा
दिलीप मोहिते
अशोक पवार
दत्ता भरणे
सुनिल शेळके
अण्णा बनसोडे
चेतन तुपे
प्रकाश सोळंखे
बाळासाहेब आजबे
दीपक चव्हाण
राजेश पाटील