टीम AM : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालयं त्यास जबाबदार राहील, असं कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितलं आहे.
पूर्णवेळ प्राचार्य, कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांच्या कोर्सेसची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात आली असून, काही कोर्सेसची क्षमता घटवण्याचा निर्णय कुलगुरुंनी घेतला आहे.
पदवी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालयांची मान्यताप्राप्त संख्या पाहूनच प्रवेश घ्यावा, असं आवाहन शैक्षणिक विभागानं केलं आहे.