टीम AM : बीड जिल्ह्यातील सुशिक्षित महिलांसाठी आनंदाची बातमी असून, महिला व बालकल्याण विभागाकडून मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून 555 पदांची मेघा भरती सुरू झाली आहे.
राज्य सरकार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्ताने जिल्हा परिषद अंतर्गत मोठ्या प्रमाणात भरती करणार आहे. ही भरती प्रक्रिया राज्यस्तरावर राबविण्यात येणार आहे. परंतू, या अगोदरच सुशिक्षित महिलांसाठी आनंदाची बातमी आली असून आपल्या गावातील व प्रभागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांची भरती सुरू झाली आहे. ही मानधन तत्वावर भरती असून जिल्हाभरात तब्बल 555 जागेची भरती केली जाणार आहे. यासाठी वय 18 ते 35 ची अट असून विधवांसाठी 5 वर्षांची सूट आहे. यासाठी ज्याठिकाणी जागा रिक्त आहेत, त्या गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना बोर्डवर या भरतीची माहिती तसेच किती व कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत याची माहिती डकवली आहे.
शिक्षण व वयाची अट काय ?
अंगणवाडीत सेवा करण्याची इच्छा असलेल्या उमेदवार महिलांचे 12 वी शिक्षण झालेले असावे, वय 18 ते 35 असणे आवश्यक आहे. ज्या महिला विधवा आहेत त्यांना 5 वर्षांची सूट देण्यात आली असून त्यांच वय 40 वर्ष असावं.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ?
महिला व बालकल्याण विकास विभागाकडून चालविण्यात येत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती सुरू झाली आहे. यासाठी दि. 26 जूनपासून अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. याची शेवटची तारीख 7 जुलै आहे. या तारखेच्या आत अर्ज भरणे आवश्यक आहे.
मानधन किती ?
अंगणवाडी सेविका व मदतनीस ही दोन्ही पद शासन कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरती करतो. अंगणवाडी सेविका पदासाठी 7 हजार 200 इतकं मानधन असून मदतनीस पदासाठी 5 हजार 500 इतकं मानधन आहे.
तालुकानिहाय जागा
बीड – सेविका 4, मदतनीस 55, केज – सेविका 9, मदतनीस 42, गेवराई – सेविका 06, मदतनीस 100, आष्टी – सेविका 5, मदतनीस 68, पाटोदा – सेविका 2, मदतनीस 24, शिरुर कासार – सेविका 4, मदतनीस 33, वडवणी – सेविका 00, मदतनीस 24, धारुर – सेविका 2, मदतनीस 22, माजलगाव – सेविका 3, मदतनीस 48, परळी – सेविका 2, मदतनीस 27, अंबाजोगाई – सेविका 00, मदतनीस 47 या प्रमाणे तालुकानिहाय जागा भरण्यात येणार आहेत.