डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 63 वा दीक्षांत समारंभ येत्या 27 जूनला

टीम AM : औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 63 वा दीक्षांत समारंभ येत्या 27 तारखेला होणार आहे. या समारंभात कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दोन इमारतींचं उद्घाटन आणि सुपर काँप्युटर अर्थात महासंगणकाचं लोकार्पण होणार आहे. 

कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या सोहळ्यात पदवीधरांना आणि दोनशे एक्क्याण्णव संशोधकांना पदव्या प्रदान करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, ’नवीन शैक्षणिक धोरण – 2020’ मुळे शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडेल, असा विश्वास कुलगुरु येवले यांनी व्यक्त केला आहे. विद्यापीठाशी संलग्नित औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

’नॅक’मूल्याकंनात ’ए’, ए प्लस आणि ए प्लस प्लस’ दर्जा प्राप्त झालेल्या आठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, तसंच अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित यांचा यात समावेश आहे.