इंदुरीकर महाराज अडचणीत : गुन्हा दाखल करण्याचे आदेश

टीम AM : लिंगभेदावर भाष्य केल्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. 

इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनादरम्यान केलेल्या या भाष्यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती. कनिष्ठ न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

हा गुन्हा रद्द करावा, म्हणून इंदोरीकर महाराज यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने त्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती, आज यासंदर्भात झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.