टीम AM : मुंबई – पुणे ‘एक्स्प्रेस वे’ वर लोणावळ्याजवळ ओव्हर ब्रीजवर ऑइल टँकरचा अपघात होऊन भीषण आग लागली आहे. यामुळे ब्रीज खाली देखील अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून सध्या वाहतूक लोणावळा शहरातून वळवली जात आहे.
या अपघातामुळे ‘एक्स्प्रेस वे’ वर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून यामुळे बचावकार्य वेगाने केले जात आहे. हायवेवर अनेक गाड्यांना आग लागली आहे. आगीच्या दरम्यान, या अपघातात 4 जण ठार झाले आहेत तर 2 जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.