टीम AM : एकेकाळी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आज 9 जून रोजी अमिषा पटेलचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही गोष्टी…
अमिषाचा जन्म 9 जून 1976 रोजी मुंबईत झाला होता. अमिषाचा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला होता. अमिषाने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमधून पदार्पण केले. अमिषाचे यश पाहून तिचे आई – वडील खूश होते. मात्र, अमिषाने वडिलांनाच कायदेशीर नोटीस पाठवली तेव्हा खळबळ उडाली होती.
अमिषाने सुरुवातीला हिट चित्रपट दिले. त्यानंतर तिचे चित्रपट काही खास चालले नाहीत. या सगळ्याला अमिषाचा स्वभाव जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. तिचे आणि निर्मात्यांचे सतत वाद व्हायचे. अमिषाने तिच्या वडिलांना सुमारे 12 कोटी रुपये हडप केल्याचा आणि खात्यांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनेकांनी तिला समजावले होते. मात्र अमिषाने कुटुंबात देखील कायद्याचा वापर केला होता.
अमिषाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा ‘गदर 2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमिषासोबत बॉलिवूड अभिनेता सनी देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘गदर 2’चं कथानक 1970 मध्ये झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धावर आधारित असणार आहे.
या चित्रपटात तारा सिंह आणि सकीना यांचा मुलगा ‘जीते’ भारतीय सैनिकाच्या रुपात दिसणार आहे. या भूमिकेत उत्कर्ष शर्मा झळकणार आहे. ‘गदर’ मध्ये तारा सिंह आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी पाकिस्तानात गेला होता. यावेळी तो आपल्या मुलाला सोडवण्यासाठी पाकिस्तानामध्ये शिरकाव करताना दिसणार आहे. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.