टीम AM : मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. अंबाजोगाई – बीड या मार्गावर दिवसागणिक अपघात होत आहेत. आज (दि. 5) दुपारी 3 वाजताच्या दरम्यान नेकनुर जवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात बाप – लेकाचा जागीच मृत्यु झाला आहे.
नारेवाडी येथील विनायक दादाहरी चौरे आणि विनोद विनायक चौरे हे दोघे बाप – लेक बीडवरून गावाकडे निघाले होते. नेकनूर पासून कांही अंतरावर असणाऱ्या गुलाम सागर तळ्याजवळ कालिका प्रतिष्ठान, माऊली मंगल कार्यालयाच्या जवळ चारचाकी विस्टा गाडी क्र. – एमएच 17 व्ही 9697 तसेच पॅशन प्लस मोटारसायकल क्रमांक – एमएच 20 सीएन 4015 आणि मोटारसायकल होन्डा शाईन क्र. – एमएच 23 एझेड 5810 चा भिषण अपघात झाला.
या अपघातात बाप – लेकाचा जागीच मृत्यु झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून नेकनूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.