टीम AM : जे.जे. रुग्णालयातील प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा राज्य सरकारने मंजूर केला आहे.
जे.जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्स विभागातील डॉक्टर, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना त्रास देतात त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिनी पारेख यांच्यासह 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे टाकले होते.
याप्रकरणावर तात्याराव लहाने यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. यानंतर आता सराकरने त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर केला आहे.