अंगणवाडी सेविकांना दिलासा : राज्य सरकारने मानधनात केलेली वाढ जुलैपासून मिळणार

टीम AM : राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला. त्यानंतर आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना राज्य सरकारने केलेल्या मानधनातील वाढ ही जुलैपासून मिळणार असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगिलं आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला. 

(Advt.)

पण वाढ होऊनही गेली दोन महिने मानधनात कोणतीच वाढ झाली नव्हती. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्माऱ्यांनी निराशा व्यक्त केली होती. अखेर आता जुलैपासून मानधन वाढ मिळणार असल्याने अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळणार आहे.