टीम AM : दहावीच्या निकालासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. आज 2 जूूनला दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10 वी परीक्षेचा निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.
10 वी चा निकाल कसा पाहाल ?
अधिकृत वेबसाइट – mahresult.nic.in वर लॉग इन करा.
महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा.
सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव.
लॉगिन करा आणि तुमचा महा10वीचा निकाल तपासा
यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2023 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आली.