शैक्षणिक अंकेक्षणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न 83 महाविद्यालये नापास

कुलगुरुंनी प्रवेश क्षमता कमी करण्याचा घेतला निर्णय

टीम AM : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित 83 महाविद्यालये ‘अ‍ॅकॅडमिक ऑडिट’ अर्थात शैक्षणिक अंकेक्षणात ‘नो ग्रेड’ म्हणजेच नापास ठरली आहेत. 

चार जिल्ह्यातून 19 महाविद्यालयांना ए, बी, सी, डी याप्रमाणे श्रेणी प्राप्त झाली. तर बीड जिल्हयात सर्वांधिक 33 महाविद्यालये नापास ठरली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील 22, औरंगाबाद जिल्ह्यातील 19 आणि जालना जिल्ह्यातील 09 महाविद्यालये नोग्रेड अर्थात नापास ठरली आहेत. 

या महाविद्यालयांची पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ तपासून प्रथम वर्षांची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात येणार आहे. किंवा विद्यार्थी संख्याही घटविण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली आहे.