कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची माहिती
टीम AM : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 63 वा दीक्षांत सोहळा राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या उपस्थितीत 27 जूनला होणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली आहे.
यामध्ये ऑक्टोबर – नोव्हेंबर 2021 आणि मार्च – एप्रिल 2022 या वर्षातील पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येईल. तसंच 19 नोव्हेंबर 2022 ते आजपर्यंत पीएच.डी प्राप्त करणाऱ्या संशोधकांना दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात येईल.
दीक्षांत समारंभा संदर्भात कुलपती रमेश बैस यांची कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी 15 मे रोजी भेट घेऊन दीक्षांत सोहळयाचं निमंत्रण दिलं होतं. या निमंत्रणाचा स्विकार करुन सोहळ्याची तारीख 27 जून निश्चित करण्यात आल्याचे राजभवनाच्यावतीने कळविण्यात आलं असल्याची माहिती कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली आहे.