‘टीम AM : संसारगाड्यात रमलेल्या होममेकरच्या स्वप्नांची गोष्ट उलगडणारा ‘बटरफ्लाय’ हा चित्रपट 2 जूनला प्रदर्शित होईल. अजित भुरे यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. असीम एंटरटेन्मेंट आणि ॲप्रोग्रॅम स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अजित भुरे, अभिजित साटम, मधुरा वेलणकर – साटम या चित्रपटाचे निर्माते आहेत. मधुरा वेलणकर यांच्या संकल्पनेला विभावरी देशपांडे यांनी कथेत बांधले आहे. विभावरी देशपांडे आणि मीरा वेलणकर यांनी पटकथा लेखन, तर कल्याणी पाठारे, आदित्य इंगळे यांनी संवाद लेखन केले आहे.
वैभव जोशी, गुरू ठाकूर यांनी गीतलेखन, शुभाजित मुखर्जी यांनी संगीत दिग्दर्शन, वासुदेव राणे यांचे छायांकन आहे. वैशाली माडे आणि हंसिका अय्यर यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. या चित्रपटात मधुरा वेलणकर – साटम, अभिजित साटम, महेश मांजरेकर, राधा धारणे, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर अशी स्टारकास्ट आहे.