टीम AM : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) यूजीसी – नेट परीक्षा 13 ते 22 जून या कालावधीत विविध सत्रांमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी 10 मे ते 31 मे या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष डॉ. एम. जगदेश कुमार यांनी ट्टिटरवर दिली आहे.
ही परीक्षा एकूण 83 विषयांमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या सविस्तर माहितीसाठी www.ugcnet.nta.nic.in वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. कुमार यांनी केले आहे. सहायक प्राध्यापक पदाला पात्र होण्यासाठी तसेच ज्युनिअर रीसर्च फेलोशिप मिळवण्यासाठी ही राष्ट्रीयस्तरावरील परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेची आतुरतेने वाट पाहतात. ही परीक्षा जाहीर झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.