टीम AM : परळी शहरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. शहरात एका घरात अचानक गॅसच्या सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्देवी घटना मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास शहरातील बरकत नगर भागात घडली.
अदिल उस्मान शेख (वय 14) असं स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. तर शमशाद बी सय्यद हाकीम, शेख आवेस गौस व अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर परळी शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.