टीम AM : छत्रपती संभाजीनगर इथं दोन कामगारांचा ड्रेनेज चेंबरमध्ये बुडून मृत्यू झाला. सलीम अली सरोवराजवळ ही दुर्घटना घडली. ड्रेनेज साफ करण्यासाठी चेंबरमध्ये उतरलेला एक कामगार बुडाल्याचं लक्षात येताच, इतर तिघांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सर्वजण चेंबरमध्ये बुडाले.
अग्निशमक दलाच्या जवानांनी या सर्वांना बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केलं असता, अंकुश बाबासाहेब थोरात आणि रावसाहेब सदाशिव घोरपडे या दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं.
अन्य दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.