टीम AM : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर आपण येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार आहोत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागं घ्यावा, या मागणीसाठी दोन दिवसांपासून पक्ष कार्यकर्ते मुंबईत आंदोलन करत आहेत. पवार यांनी आज या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना समजावलं, त्यावेळी ते बोलत होते. आपण पक्षाच्या हितासाठी निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचं आणि यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
या संदर्भातल्या कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, असंही पवार यांनी सांगितलं.