यात्रा जीवावर बेतली : ट्रॅव्हल्स – कारचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार 

टीम AM : ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथील नेवरी रस्त्यावर हा भीषण अपघात झाला असून अपघात इतका भीषण होता की यात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

सुनिता सदानंद काशीद (वय 61), चंद्रकांत दादोबा काशीद (वय 62, रा. गव्हाण, ता. तासगाव) अशोक नामदेव सूर्यवंशी (वय 64), योगेश विलास कदम चालक (वय 35) अशी मयतांची नावे आहेत. तर सदानंद दादोबा काशीद हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. 

अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.