टीम AM : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य लोकसेवा आयोगाचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्यांंनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
बीड शहरातील आदर्श गणेशनगरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या तरुणाने 30 एप्रिल रोजी झालेली राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र, पेपर अवघड गेल्याने तो चिंतेत होता. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
अक्षय अप्पा पवार असं आत्महत्या करणाऱ्या या विद्यार्थ्यांचं नाव आहे. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.