टीम AM : पंजाबमध्ये गॅस गळतीमुळे दुर्घटना घडली असून 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गॅस गळती झाल्यानंतर 10 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गॅस गळती झालेला परिसर सील करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, लुधियानातील ग्यासपूरा भागात गॅस गळतीची घटना घडलीय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
याशिवाय रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. गॅस गळती कुठून झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. गॅस गळती सुरू झाल्यानंतर गुदमरून 10 जण बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, गॅस कोणत्या कारखान्यातून लीक झाला की आणखी कुठून याची नेमकी माहिती समजू शकलेली नाही.