विधानपरिषद : 12 सदस्यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून दोन आठवड्यांसाठी स्थगिती

टीम AM : राज्य विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून दोन आठवड्यांसाठी स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 12 सदस्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता, सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून आमदारांची नवीन यादी तयार करण्यात येत आहे. 

या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. यावर न्यायालयानं राज्य सरकारला दोन आठवड्यांनी उत्तर देण्यास सांगितलं आहे.