टीम AM : कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बस आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता.
अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर चार जणांचे मृतदेहही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
रात्री 2:15 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. सर्व प्रवासी गाढ झोपेत असतानाच हा अपघात झाला. पुण्यातील पुणे – बेंगलोर महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात 22 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस, वाहतूक विभाग, अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.