नमिता मुंदडा यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपची उमेदवारी जाहीर होणार?

अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केज मतदार संघातील विधानसभेच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला. गेल्या चार पाच दिवसापासून नमिता मुंदडा या भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ती शक्यता आता खरी होताना दिसत आहे. दरम्यान केज मतदार संघातून भाजपच्या वतीने नमिता मुंदडा यांना आज उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

नमिता मुंदडा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यात म्हणटले आहे की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्विकारून मंजुर करावा ही विनंती. असे त्यांनी नमुद केले आहे.नमिता मुंदडा यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नमिता मुंदडा यांना भाजपने उमेदवारी दिल्यास विदयमान आ. संगिता ठोंबरे या कोणती भुमिका घेतील याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.